तालुका प्रतिनिधी अतुल ठाकरे
✍️देसाईगंज: ग्रामीणरुग्णालय देसाईगंज येथे आल्यानंतर रुग्णांना बऱ्याचशा समस्यांचा सामना करावा लागतो सविस्तर
सरकारी दवाखान्यात गरीब वर्ग शेतकरी लोकांची गर्दी पहावयास मिळते रुग्णालयात पुरेसी सुविधा नसल्यामुळे खाजगी दवाखान्यामध्ये जनतेची लूट सुरू आहे गर्भवती महिला रुग्णालयात गेली असता तिला सोनोग्राफी एक्स-रे यासाठी खाजगी दवाखान्यात जावे लागते रुग्णाजवळ दुसरा पर्याय नसल्यामुळे खाजगी डॉक्टर अव्वाच्या सव्वा फी घेऊन गरीब जनतेचा खिसा खाली करत असतात अपुऱ्या असलेल्या सुविधा रक्तपेढी सिटीस्कॅन एक्स-रे
सोनोग्राफी कॅन्सर रक्त तपासणी डायलॉजीस्ट या सारखी एक ही सुविधा ग्रामीण रुग्णालयात दिसत नाही शिवाय मोठे आप्रेशन किंवा गंभीर आजार असल्यास एक ही स्पेशालिस्ट डॉ.नाही ८0% गरीब जनतेला गडचिरोली किंवा ब्राह्मपुरी रेफर करण्यात येते असे ग्रामीण रुग्णालय असून सुद्धा कोणत्या कामाचे नाही, दंत स्पेशालिस्ट मतिमंद रुग्णांसाठी आठवड्यातून एकदा तरी स्पेशालिस्ट डॉक्टरानी व्हिजिट दिली पाहिजे यापैकी एकही सुविधा ग्रामीण रुग्णालय देसाईगंज येथे नसल्यामुळे जनतेंला त्रास सहन करावा लागतो,
ग्रामीण रुग्णालय देसाईगंज हे उपजिल्हा रुग्णालय घोषित करून अपुऱ्या सुविधा पुरवण्यात यावे अशी मागणी प्रमोद दहिवले यांच्याकडून वारंवार होत आहे.

0 Comments