आलोक अवस्थी यांनी सर्व अधिकारी, कर्मचारी, स्थानिक नागरिक, सखी मंच च्या महिला आणि विशेष पाहुणे आणि त्यांचे कुटुंबीय यांना शुभेच्छा दिल्या आणि स्मृतिचिन्ह, पुष्पगुच्छ व शाल देऊन त्यांचा सत्कार केला. विशेष पाहुणे आणि त्यांनी दलामध्ये केलेल्या सेवांचे कौतुक केले आणि त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. यावेळी विशेष पाहुण्यांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले. या संदर्भात श्री आलोक अवस्थी (सेकण्ड इन कमांण्डेन्ट )यांनी सांगितले की, मेरी माती मेरा देश अभियान 09 ऑगस्ट पासून साजरे केले जात आहे. संपूर्ण देशामध्ये शीला फलक, पंच प्राण प्रतिज्ञा, अमृत वाटिकेची स्थापना, वीरांची पूजा इत्यादी कार्यक्रम केले जात आहेत. सखीमंच ची महिला वीरनारी च्या सहकार्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या , शूर स्वातंत्र्यसैनिक आणि वीरांचा सन्मान करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. ज्यांनी देशाच्या सेवेत अमूल्य योगदान दिले. कार्यक्रम समाप्ती नंतर सर्व सदस्यांना स्नेहभोजन चे आयोजन केले गेले होते .

0 Comments