Ticker

6/recent/ticker-posts

देसाईगंज येथील शिबिरात 240 रुग्णांची तपासणी 70 रुग्णांची शस्त्रक्रिये साठी निवड

✍️: देसाईगंज येथील कमलानगर मदिना मस्जिद समोरील चौका मध्ये महात्मे नेत्रपेढी नेत्र रुग्णालय नागपूर,हेल पेज इंडिया च्या सॊजण्याने, नागरिक रक्षक संस्था, लोक कल्याण ग्राहक संरक्षण संस्था, केयर क्लिनिक देसाईगंज च्या वतीने नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरा मध्ये 240 रुग्णाची तपासणी करण्यात आली. यातील 70 रुग्णांची शास्त्रक्रिये साठी निवड करण्यात आली.



या शिबिराचे उदघाटन आरमोरी क्षेत्राचे नवनियुक्त आमदार रामदासजी मसराम साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून नाना भाऊ नाकाडे माजी कृषी सभापती जिल्हा परिषद गडचिरोली, माजी नगराध्यक्ष जेसाभाऊ मोटवानी,डॉ. इकबाल बेग, डॉ. सुमय्या पटेल, माजी नगरसेवक कुडडूस पटेल, माजी नगर सेवक भीमराव नगराळे, लोक कल्याण ग्राहक संरक्षण संस्थे चे जिल्हा प्रमुख अमिता ताई मडावी, हेल्प एज इंडिया चे राशेदा शेख, राष्ट्रवादी चे प्रदेश सरचिटणीस श्यामजी धाईत उपस्थित होते. शिबिरात महात्मे रुग्णालय चे डॉक्टर चमुंनी सेवा दिली



या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रासेदा शेख यांनी, संचालन लतीफ शेख यांचे आभार प्रदर्शन केले 
कार्यक्रम यशस्वीते साठी लतीफ शेख, नावेद पटेल, योगेश नेवारे, मच्छिन्द्र मुळे, जावेद शेख, अजमत खान, मोनाली दुगा, नेहा लांजेवार, काजल मेश्राम यांनी अथक परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments