बांगलादेशातील हिंदूवरील अत्याचारांच्या निषेधार्थ आज जागतिक मानवाधिकार दिनाचे औचित्त साधून सकल हिंदू समाजाच्या वतीने येथील शिवाजी महाविद्यालयाच्या पटांगणावरून सदर यात्रा काढण्यात आली. त्यानंतर चंद्रपूर मार्गावरील देवकुले यांच्या पटांगणावर या यात्रेचे रुपांतर निषेध सभेत करण्यात आले.
यावेळी सभेत अनेक प्रमुख वक्त्याचे मार्गदर्शन झाले. 5 ऑगस्ट 2024 पासून बांग्लादेशात आता तर हिंदूंवरील हल्ले आणि अत्याचार अधिकच वाढले आहेत. आजवर हिंदू अल्पसंख्यकांवर दोनशेहून अधिक हल्ले झाले असून त्यात 350 पेक्षा अधिक लोक मृत्यूमुखी पडले आहेत. हिंदू व्यावसायिक, हिंदू कलाकार, हिंदू नेत्यांच्या हत्या करण्यात आलेल्या आहेत. बांग्लादेशातील हिंदूंवर होणार्या अत्याचाराच्या विरोधात उभे झालेले इस्कॉनचे साधू चिन्मय कृष्णदास यांच्यावर राष्ट्रध्वजाच्या अवमानाचा खोटा आरोप लावून त्यांना अटक करण्यात आली आहे.
महिलांवर बलात्कार, त्यांच्याशी लैंगिक दुर्व्यहार आणि त्यांच्या मृतदेहांची विटंबनाही केली जात आहे. दुर्दैवाने या घटनांतील दोषी मोकाट फिरत आहेत आणि वैधानिक व शांततापूर्ण मार्गात लढा देणार्या हिंदूंच्या धार्मिक नेत्यांनाच दोषी ठरविले जात आहे. हल्लेखोरांविरुद्ध कारवाई करण्यासाठी स्थानिक पोलिस बिचकत आहेत तर काही ठिकाणी ते गुंडांमध्ये सामील झाले आहेत. गाझा, सिरीया, लेबनॉनमधील घटनांबद्दल चिंता व्यक्त करणारे बॉलिवूड कलाकार आणि आपल्या देशातील मानवाधिकारवादी बांग्लादेशातील हिंदूवरील अत्याचारांबद्दल मूग गिळून आहेत. हिंदूंवरील अत्याचार ताबडतोब थांबविण्यात यावे, अशी भावनात्मक मागणी वक्त्यांनी या निषेध सभेतून केली.
यावेळी जनआक्रोष यात्रेत घिसूलाल काबरा, गोविंद सारडा, माजी आमदार डॉ. देवराव होळी, डॉ. नामदेव उसेंडी, किसन नागदेवे, हेमंत जंबेवार भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, रोटरी क्लबचे सुनील बट्टूवार, संजय नार्लावार, संतोष संगनवार, प्रमोद पिपरे, योगीता पिपरे, गीता हिंगे, पद्मश्री डॉ. परशुराम खुणे, अनिल पोहीनकर, अनिल कुनघाडकर, मधुकर भांडेकर, नगर संघचालक अॅड. निळकंठ भांडेकर, जिल्हा संपर्क प्रमुख हेमंत राठी, अखिल भारतिय विद्यार्थी परिषदेचे विभागप्रमुख प्रा. धर्मेंद्र मुनघाटे, चांगदेव फाये, दिलीप जाजू, डॉ. प्रांजली आईंचवार, मंजुषा कृष्णापूरकर यासह विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसवेक संघ, अभाविपचे पदाधिकारी व सकल हिंदू समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता.



0 Comments