देसाईगंज..... आगामी होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक संबंधाने स्थानिक पटेल लॉन देसाईगंज येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठक व माजी मंत्री आमदार राजे धर्मराव बाबा आत्राम यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या बैठकीच्या अध्यक्ष स्थानी पक्षाचे जिल्हा अध्यक्ष रवीभाऊ वासेकर, प्रमुख अतिथी म्हणून आरमोरी विधानसभेचे माजी आमदार राष्ट्रवादी चे नेते रामकृष्ण मडावी, जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती नानाभाऊ नाकाडे, प्रदेश सरचिटणीस युनूसभाई शेख, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष समय्या पसूला, युवक चे जिल्हा अध्यक्ष लीलाधर भरडकर, महिला जिल्हा कार्याध्यक्ष वृषालीताई
भोयर, अल्पसंख्यांक जिल्हा अध्यक्ष आरिफ भाई पटेल विद्यार्थी जिल्हा अध्यक्ष चेतन पेंदाम,जिल्हा उपाध्यक्ष योगेश नांदगाये,जिल्हा उपाध्यक्ष दिलीप भाऊ मोटवानी, शैलेश पोटवार,विधानसभा अध्यक्ष किशोरभाऊ तलमले, कार्याध्यक्ष सुनील नंदनवर, चोप चे माजी सरपंच आत्मारामजी सूर्यवंशी,
मिलिंद जी डोंगरे, तालुका अध्यक्ष संजय साळवे, शहर अध्यक्ष लतीफभाई शेख, तालुका कार्याध्यक्ष मनोज तलमले, इत्यादी उपस्थिती होते. या वेळी तालुक्यातील विविध पक्षाच्या सेकडो कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला, त्यांना पक्षाचं दुपट्टे घालून धर्मराव बाबा आत्राम यांनी प्रवेश करून घेतला.
आगामी निवडणूक युती सोबत बैठक घेऊन समाधान कारक निर्णय झाले तर युती सोबत लढू नाही तर वेळ पडली तर स्वातंत्र्य लढू असे
उदगार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष माजी मंत्री आमदार राजे धर्मराव बाबा आत्राम यांनी म्हटले आहे.
करिता सर्व कार्यकर्त्यांनी मतभेद विसरून कामाला लागण्याचे आव्हान केले
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रदेश सरचिटणीस युनूस शेख, संचालन संजय साळवे, आभार प्रदर्शन लतीफभाई शेख यांनी मानले


0 Comments