Ticker

6/recent/ticker-posts

देसाईगंज येथील आधार केंद्र बंद असल्याने नागरिक त्रस्त ..

देसाईगंज :प्रत्येक नागरिकाला एक विशिष्ट ओळख देण्याचा उद्देशाने आधार ची योजना अमलात आली. मात्र  नागरिकांना आधार कार्ड काढण्यासाठी तर काही आधार दुरुस्ती साठी वणवण फिरावे लागत आहे. ज्या चुका प्रशासकीय यंत्रणेने केल्या आहेत त्यांचा दुरुस्तीचा अनावश्यक खर्च आता नागरिकांचा माथी मारल्या जात आहे. देसाईगंज शहरात ४ ते ५ महिन्यापासून नागरिक आधारकार्ड च्या कामासाठी आधार केंद्राचे चकरा मारत आहेत परंतू आधार केंद्र हा ४ ते ५ महिन्या पासून सर्व्हर डाऊन आहे असे सांगण्यात येत आहे  तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिक शेती व मजुरी चे काम करतात नागरिकांना आधार



दुरुस्ती साठी ब्रम्हपुरी तालुक्यात किंवा मोठ्या शहरात आपले काम सोडून जावे लागत आहे. तिथेही ही मोठ्या रांगेत उभे राहवे लागत आहे. काम न झाल्याने पुन्हा जावे लागते 

काही नागरिकांना आधार कार्ड अपडेट, पता बदलणे, शासकीय कामे, बँक चे कामे, आर्थिक व्यवहार, असे अनेक कामासाठी आधार ओळख पत्र आवश्यक आहे. अनेक आधार बाबत नागरिकांचे काम कित्येक महिन्यापासून अडकले आहेत तरी आधार कार्ड चे सबंधित कामे सामाजिक संस्थामार्फत देसाईगंज शहरात सुरू करण्यात यावी अन्यथा आम आदमी पार्टी  सेकडो नागरिकांना सोबत घेऊन आंदोलन करेल.

Post a Comment

0 Comments