येत्या दोन महिन्यांत ई लायब्ररी विद्यार्थ्यांसाठी खुली करायची असल्याने कामांना गती देण्याबरोबरच प्रत्येक कामात दर्जा राखण्याच्या सूचना केल्या.
ही विदर्भातील सर्वांत मोठी ई लायब्ररी असुन यामध्ये जवळपास २०० विद्यार्थ्यांची आसन क्षमता असणार आहे. तर ५० विद्यार्थ्यांसाठी संगणकीय प्रणालीने तंत्रज्ञानयुक्त बैठक व्यवस्था या ठिकाणी करण्यात येत आहे. विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनासाठी आयआयटी खडगपुर सोबत ऑनलाईन कनेक्ट या ठिकाणी असणार आहे. सोबतच सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांची पुस्तके याठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
मुला-मुलींसाठी स्वतंत्र प्रसाधनगृह, शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय, पुर्णतः वातानुकूलित यंत्रणा तसेच याठिकाणी ट्रेनिंग व मार्गदर्शनासाठी मोठे सुसज्ज हॉल देखील बनविण्यात येत आहे.


0 Comments