Ticker

6/recent/ticker-posts

शासनाच्या कल्याणकारी योजना गरजु कुष्ठांतेयाना मिळण्यात यावा यासाठी मा आमदार यांना निवेदन

✍️ दिनांक 12/9/2025 रोजी वडसा तालुक्यातील कुष्ठांतेय बांंधवानी संजय गांधी निराधार योजना व शासनाच्या विविध कल्याणकारी योजना गरजु कुष्ठांतेयाना मिळण्यात यावा यासाठी मागण्या घेऊन आरमोरी निर्वाचन क्षेत्राचे मा आमदार रामदास मसराम साहेब याना निवेदन देण्यात आले, बहुतांश विक्रुतीग्रस्त कुष्ठांतेयाना कुष्ठरोगामुळे आलेल्या अपायामुळे काम करणे शक्य होत नसल्याने आपला उदरनिर्वाह कसा करावा हा प्रश्न त्यांच्या पुढे आहे, कुष्ठांतेयाना
 मिळणाऱ्या संजय गांधी निराधार योजना व ईतर कल्याणकारी योजना साठी अपंग प्रमाणपत्राची 40% अट घातली आहे तसेच कुष्ठरोगामुळे आलेल्या विक्रुतीला 15% ते 20% अपंग प्रमाणपत्र दिले जाते त्यामुळे शासनाच्या कल्याणकारी योजनेपासून अनेक कुष्ठांतेय बांधव वंचित आहेत, त्यामुळे  वडसा




 तालुक्यातील आत्मनिर्भर कुष्ठांतेय समितीच्या वतीने समितीचे अध्यक्ष महेंद्र खरकाटे, कुष्ठांतेय अधिकार मचंचे लतीफ शेख सर, देसाइगंज   संघर्ष समितीचे अध्यक्ष भारत दयलानी ,विदया कांबळे व शेकडो गरजु कुष्ठांतेय बंधु भगिनी ,आमदार रामदास मसराम साहेब याना निवेदन देण्यात आले, त्यावेळी मा आमदार साहेब यांनी या प्रश्नाकडे जातीने लक्ष देईल व ते प्रश्न पुर्ण पणे सोडविण्यासाठी परिपूर्ण प्रयत्न करीन असे पक्के आश्वासन कुष्ठांतेयाना दिले

Post a Comment

0 Comments