Ticker

6/recent/ticker-posts

देसाईगंज : सरकारने सिंधी समाजाला कायमस्वरूपी जमीन भाडेपट्टा द्यावा: माधवदास निरंकारी

सिंधी विस्थापितांच्या जमिनीचे नियमन पूर्ण करण्याची मागणी*
 सिंधी समाजाला कायमस्वरूपी जमीन भाडेपट्टा द्यावा: माधवदास निरंकारी

*दिनांक: 10 ऑक्टोंबर २०२५*

देसाईगंज/ (भारत दयलानी):–  देसाईगंज येथील सिंधी कॉलनीतील विस्थापितांच्या निवासी व वाणीज्यक जमिनीचे शर्तभंग नियमानुकूलन *विशेष अभय योजना 2025* अन्वये करण्याची मागणी  विदर्भ सिंधी विकास परिषद च्या  शिष्टमंडळाने  तहसील अधिकारी यांच्याकडे केली.  
गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज शहरात अनेक वर्षांपासून राहणाऱ्या सिंधी समुदायाला त्यांच्या हक्कांसाठी संघर्ष करावा लागत आहे.

कायमस्वरूपी भाडेपट्ट्यांची वारंवार मागणी करूनही, प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधी केवळ आश्वासने देत आहेत. विदर्भ सिंधी विकास परिषदेचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष माधवदास निरंकारी यांनी सिंधी समुदायाला लवकरच कायमस्वरूपी भाडेपट्टे देण्याची मागणी केली आहे.




या संदर्भात देसाईगंज तहसील अधिकारी यांना निवेदन दिले. विदर्भ सिंधी विकास परिषद च्या  शिष्टमंडळाने दिवाळीच्या आधी कार्यवाही पुर्ण व्हावी अशी विशेष विनंती केली. निवेदन देताना ल्विदर्भ सिंधी विकास परिषद गडचिरोली जिल्हा अध्य्क्ष माधवदास जी निरंकारी,उपाध्यक्ष जेष्ट नेते जेसाभाऊ मोटवानी,सदस्य विक्की निरंकारी, लक्ष्मण भाऊ निरंकारी  कांग्रेस चे माजी नगर सेवक हरिश मोटवानी,हरदू  भाऊ मोटवानी,नितिन नागदेवे,पुरोषतम डेंगानी,सुरेश  डेंगानी, भारत दयलानी   उपस्थित होते.  





निवेदनात शासन निर्णय दिनांक 15 मे 2025 पासून चार महिने उलटूनही नियमनाची प्रक्रिया सुरु न झाल्याचे नमूद करून, गडचिरोली जिल्ह्यातील एकमेव सिंधी कॉलनी वडसा-देसाईगंज येथील प्रकरणे त्वरीत पूर्ण करावीत, जेणेकरून विस्थापितांना लाभ मिळेल, अशी मागणी करण्यात आली.

Post a Comment

0 Comments