✍️
*देसाईगंज -*
काँग्रेस पक्षाचे माजी नगर सेवक आणि सामाजिक कार्यकर्ते *जमाल शेख* यांनी आज समाजवादी पक्षात प्रवेश केला, समाजवादी पार्टी देसाईगंज नगर पालिका निवडणुकीत आपले स्व बळावर उमेदवार उभे करणार अशी माहिती दिली होती परंतु अजून पर्यंत देसाईगंज प्रभाग क्रमांक 9 जवाहर किदवाई वार्दात समाजवादी पक्षाचे उमेदवार कोण असणार या कडे सर्वांचे लक्ष लागले होते परंतु अखेर आज समाजवादी पक्षाने मोठा बॉम्ब फोडत प्रभाग 9 मधून काँग्रेस माजी नगर सेवक जमाल शेख यांना उमेदवारी दिली आहे,
एकूण आज पर्यंत प्रभाग क्रमांक 5 येथून सलमा मुजीब शेख, आणि प्रभाग 9 मधून जमाल गणी शेख ह्या दोन उमेदवारांची घोषणा करण्यात आलेली आहे पुढील 17 नोव्हेंबर रोजी आणखी प्रभागातून बाकी उमेदवार घोषित करणार आहोत अशी माहिती जिल्हा अध्यक्ष इलियास खान यांनी दिली आहे,जमाल शेख यांच्या उमेदवारिणी समाजवादी पक्षात उत्साहाचे वातावरण आहे, आज समाजवादी पक्षाच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे महाराष्ट्र सचिव डॉ महेश कोपुलवार प्रामुख्याने उपस्थित होते या डॉ कोपुलवार यांनी समाजवादी पक्षाच्या
उमेदवारांना आपल्या पक्षातर्फे पाठिंबा जाहीर केला सदर बैठकीला, अल्पसंख्यांक विभाग जिल्हा अध्यक्ष खलील खान, जिल्हा महासचिव महेबूब खान, जिल्हा उपाध्यक्ष आमिर यासिनी, जिल्हा उपाध्यक्ष कैलाश बगमारे, समाजवादी नेते फैझान पटेल, शहर अध्यक्ष सादिक शेख (बबलू ), हाजरा शेख, सलमा शेख, मुजीब शेख, मुन्ना भाई, जब्बार शेख,राशीद शेख, शादुल खान,मोहम्मद खान,जावेद खान,
आरिफ खान, आणि समाजवादी पक्षाचे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते,


0 Comments