*देसाईगंज :-*
नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडमोडींना वेग आला असून राज्यातील नगर परिषद निवडणुकांचा कार्यक्रम अंतिम टप्प्यात आल्याची माहिती आहे. तर, दुसरीकडे इच्छुकांनी आपल्या उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. दरम्यान, अजित पवार गटाकडून देसाईगंज
नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या व सक्रिय राष्ट्रवादी कार्यकर्त्या निता संजय गुरु यांना देसाईगंज नगराध्यक्ष पदाची उमेदवारी घोषित झाली असून याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मधे माजी नगराध्यक्ष जेसा मोटवानी तसेच जेष्ठ अधिवक्ता संजय गुरु यांनी आज दिनांक 07 नोव्हेंबर 2025 रोजी मा.ना.
उपमुख्यमंत्री अजित पवार, मा.प्रफुल भाई पटेल, मा. ना. इंद्रनील मनोहरराव नाईक - पालकमंत्री गोंदिया जिल्हाराज्यमंत्री उद्योग, सार्वजनिक बांधकाम, उच्च व तंत्र शिक्षण, आदिवासी विकास, पर्यटन, मृद व जलसंधारण, राज्य महिला आयोग अध्यक्ष रुपालीताई चाकणकर, सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मधे जाहीर पक्ष प्रवेश केला असून नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षाला लागलेली गळती डोकेदुखीचा विषय ठरली आहे. तर माजी नगराध्यक्ष जेसा मोटवानी सह सामाजिक कार्यकर्ते व अधिवक्ता संघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेशाने अजित पवार गटाला नक्कीच फायदा होईल असे पक्षाचे म्हणणे आहे.


0 Comments