*"लखपती बिलाचा धक्का" : कुरुडच्या शेतकऱ्याच्या दारात महावितरणचा 'करंट', 4 लाख 79 हजारांचे बिल पाहून कुटुंब सुन्न*
*विशेष प्रतिनिधी, देसाईगंज:"वीज बिल भरायचं की घर विकायचं?" असा प्रश्न आज कुरुड गावच्या ठाकरे कुटुंबाला पडला आहे. कारण महावितरणच्या 'अति-स्मार्ट' मीटरने त्यांच्या साध्या घराला थेट *4,79,060 रुपयांचे* बिल पाठवून दिवसा तारे दाखवले आहेत.
*पार्श्वभूमी : सामान्य खोल्यांचं घर, लाखांचं बिल*
रामदास हरिजी ठाकरे हे अल्पभूधारक शेतकरी. घरात ना कुलर, ना मोटर, फक्त बल्ब आणि पंखा चालवणाऱ्याला ठाकरे यांना जेव्हा बिल आला, तेव्हा धक्काच। बसला महावितरणला वाटतंय का आम्ही घरात वीज तयार करतो ऐसे जानतेचा संताप आहे
*गावात संतापाची वीज, व्हॉट्सॲपवर बिलाचा 'शॉक'*
हे बिल गावात चर्चेचा विषय बनलंय. कुणी म्हणतंय "ठाकरे काकांनी घरात टाटा पॉवरचा प्लांट टाकलाय का?", तर कुणी "स्मार्ट मीटर म्हणजे 'सगळ्यांना मारणार' मीटर" अशी खिल्ली उडवतंय. बिलाचा स्क्रीनशॉट आता प्रत्येक ग्रुपवर फिरतोय आणि खाली एकच कॅप्शन - _"महावितरणचा नमस्कार, आता तुम्ही भिकारी!"_
*महावितरणचा सावध पवित्रा : 'चूक झाली, सुधारू'*
या प्रकरणी शाखा अभियंत्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले, "मीटर रीडिंगमध्ये किंवा सॉफ्टवेअरमध्ये एरर झाली असावी. आम्ही 24 तासात बिल दुरुस्त करून देऊ." पण गावकऱ्यांचा सवाल आहे - "एरर फक्त गरीबांच्या बिलातच का होते? अधिकाऱ्यांच्या घरचं बिल कधी 5 लाख आलंय का?"
*'स्मार्ट मीटर' की सामान्य माणसाच्या मुळावर?*
गडचिरोलीत हा काही पहिला प्रकार नाही. मागच्या 3 महिन्यात अनेक तक्रारी आल्यात. पण कारवाई शून्य. "आधीच नक्षलवाद, बेरोजगारी आणि महागाईने बेजार आहोत. त्यात महावितरणने असा 'स्मार्ट दरोडा' टाकला तर जगायचं कसं?" असा संतप्त सवाल नागरिकांचा आहे,
*पुढे काय?*
*स्मार्ट जमान्यातला 'अनस्मार्ट' कारभार कुणाच्या जिवावर उठणार, हा खरा प्रश्न आहे।

0 Comments