✍️ भरत दयलानी
वडसा : शहरातील सिंधी भवन येथे दिनांक २९ मार्च रोजी दुपारी २ वाजता भव्य फॅशन व टॅलेंट शोचे आयोजन करण्यात आले आहे. हा आकर्षक कार्यक्रम रुक्सार डिझायनरच्या रुक्सार सय्यद यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात येत असून वडसा व परिसरातील युवक-युवती, मॉडेल्स व कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.
या कार्यक्रमामध्ये MR, Miss, MTR, Kids आणि Teens अशा विविध कॅटेगरी ठेवण्यात आल्या असून मॉडेलिंग, डान्स व टॅलेंट
सादरीकरणासाठी स्पर्धकांना संधी दिली जाणार आहे. कार्यक्रमात अनेक मॉडेल्स, डान्सर्स व डिझायनर्स सहभागी होणार असून हा शो वडसा शहरासाठी एक आकर्षण ठरणार आहे.
या भव्य कार्यक्रमासाठी पदम कपड़ा बाजार व वैभव फैशन मोल हे आउटफिट पार्टनर म्हणून सहकार्य करत आहेत. तसेच Lahegas Wali Rental Shop, Maitri Designer आणि Naseem Designs या डिझायनर्सचा सहभाग राहणार आहे.
मेकअप क्षेत्रातून श्रिया मैकअप स्टूडियो नसीम मेकओवर आणि संगीता मेकओवर या मेकअप आर्टिस्ट सहभागी होत आहेत. तसेच कार्यक्रमासाठी इस इन साउंड लाइट वडसा, क्रिएशन फोटोग्राफर आणि राष्ट्रवार्ता न्यूज यांनीही सहकार्य दर्शविले आहे.
या कार्यक्रमाला विशेष पाहुण्या म्हणून सिने अभिनेत्री सोनल गोरखे (एकता नाट्य रंगभूमी, वडसा) उपस्थित राहणार आहेत. त्यांनी “देवा लक्ष ठेवा”, “नशा मला झाली एल्बम सॉन्ग बिंदु मुवी Item सॉन्ग कोला कोला तसेच “कारवा” शॉर्ट फिल्म यांसारख्या प्रोजेक्ट्समध्ये काम केले आहे. पुण्यातील अनेक नाटकांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या असून “थैमान” या नाटकातील इन्स्पेक्टर तेजस्विनी जगताप ही त्यांची गाजलेली भूमिका विशेष चर्चेत राहिली आहे. तसेच त्या पुण्यात स्वतःची डान्स अकॅडमी चालवतात आणि अनेक मोठ्या शोमध्ये सहभाग घेतात.


0 Comments