३२० घरांचे लाभार्थी अजूनही घरच्या पट्ट्याच्या प्रतीक्षेत आहेत, सुमारे ६ महिन्यांपूर्वी देसाईगंजमधील ४०५ घरांना मंजुरी देण्यात आली होती परंतु ६ महिने उलटूनही लाभार्थ्यांना नगर परिषदेकडून घर बांधणीची परवानगी मिळाली नाही. या संदर्भात मुख्याधिकाऱ्यांशी बोलले असता त्यांनी सांगितले की, सर्वांना पट्टे वाटून बांधकामाची परवानगी दिली जाईल. तथापि, ८५ लाभार्थ्यांना पट्टे मिळाल्याने, ३२० लाभार्थ्यांनाही लवकरच पट्टे मिळतील अशी आशा निर्माण झाली आहे.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून *आमदार रामदास मसराम* उपस्थित होते. त्यांच्या हस्ते पात्र लाभार्थ्यांना घरकुलाचे पट्टे वितरित करण्यात आले. यावेळी त्यांनी आपल्या मनोगतातून शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन केले. प्रधानमंत्री आवास योजनेमुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना स्वतःचे घर मिळण्याचे स्वप्न साकार होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाला उपस्थित : नगर परिषद अध्यक्ष लताताई सौंदरकर,उपविभागीय अधिकारी देसाईगंज प्रसेनजीत प्रधान , नगर परिषद मुख्याधिकारी सचिन चौधरी, उपाध्यक्ष तथा सभापती सार्व. बांधकाम समिती नरेश विठ्ठलानी, नगरसेवक व गटनेता विकास प्रधान, माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक शाम उईके,मोतीलाल कुकरेजा,मुरलीधर सौंदरकर,सभापती स्वच्छता, वैद्यक व आरोग्य समिती चैतनदा विधाते, सभापती महिला व बालकल्याण समिती भाविआ साधवानी,सभापती नियोजन समिती पिंकू बावणे, सभापती शिक्षण समिती बाळूभाऊ माडूलवार, नगरसेविका राधिका पत्रे,नगरसेविका गुरमीतकौर चावला,नगरसेविका आशाताई दहिवले,नगरसेविका पल्लवी मेंढे,नगरसेविका पार्वताबाई बेदरे, नगरसेविका लताताई मुळे ज्योत्सनाताई लुटे , नगरसेविका भारती कुथे तसेच नगर परिषदेचे पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने लाभार्थी उपस्थित होते. लाभार्थ्यांनी शासन व नगर परिषद प्रशासनाचे आभार व्यक्त केले.
या उपक्रमामुळे देसाईगंज परिसरातील अनेक कुटुंबांना सुरक्षित आणि हक्काचे घर मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून, शहराच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.



0 Comments