Ticker

6/recent/ticker-posts

✨ देसाईगंज नगरपरिषद निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक ९ मधून अब्दुल लतीफ रिजवी यांना जनतेचा प्रचंड पाठिंबा! ✨

गडचिरोली बाबू कुरेशी,
दि. २५ ऑक्टोबर २०२५

देसाईगंज – नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ९ मध्ये जनतेमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे. स्थानिक नागरिकांमध्ये सुशिक्षित, प्रामाणिक आणि सर्वसामान्यांचा विश्वास संपादन केलेले समाजसेवक अब्दुल लतीफ रिजवी यांचे नाव सर्वत्र चर्चेत आहे.

गेल्या २० वर्षांपासून सक्रिय राजकारणात आणि सामाजिक कार्यात सतत कार्यरत असलेले अब्दुल लतीफ रिजवी यांनी आपल्या शांत, संयमी आणि विनम्र स्वभावाने प्रभाग क्रमांक ९ मधील नागरिकांचे मन जिंकले आहे.
ते नेहमीच सर्वसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देत आले असून, प्रभागातील प्रत्येक नागरिकाच्या सुख-दुःखात सहभागी राहून मदतीचा हात पुढे करणारे नेते म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे.

प्रभाग क्रमांक ९ मधील अनेक तरुण, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि व्यावसायिक यांनी एकमुखाने सांगितले की —

> “रिजवी साहेब हे केवळ नेते नाहीत, तर आमच्यातलेच एक आहेत. त्यांनी वर्षानुवर्षे जनतेसोबत उभं राहत समाजहिताचे काम केले आहे. आम्हाला खात्री आहे की तेच आमच्या प्रभागाला खरं विकासाचं नेतृत्व देतील.”




रिजवी हे सदैव स्वच्छ प्रतिमा, पारदर्शक कार्यपद्धती आणि इमानदार वागणुकीसाठी ओळखले जातात.
त्यांनी प्रभागातील शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातही उल्लेखनीय कार्य केले असून, अनेकांना रोजगार, शिक्षण आणि आरोग्यसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत.

त्यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग क्रमांक ९ मध्ये विकासाची नवी दिशा आणि प्रगतीचा प्रवाह निर्माण होईल, अशी जनतेत ठाम भावना आहे. नागरिकांनी त्यांना “भावी नगरसेवक” म्हणून पाठिंबा दर्शवित, नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक ९ मधून प्राबल्य उमेदवार म्हणून अब्दुल लतीफ रिजवी यांना उतरविण्याची मागणी केली आहे.

🌟 जनतेची अपेक्षा —

“आम्हाला हवा प्रामाणिक, सुशिक्षित आणि कार्यक्षम नेता – आणि तो म्हणजे अब्दुल लतीफ रिजवी!”

रिजवी यांच्यावरील हा लोकविश्वास आणि जनतेचा आशीर्वाद पाहता, प्रभाग क्रमांक ९ मधील वातावरणात विकास, बदल आणि जनसेवेची नवी उमेद निर्माण झाली आहे.

Post a Comment

0 Comments