Ticker

6/recent/ticker-posts

-देसाईगंज : नगराध्यक्षाच भाजपने पत्ता कट केला, आता हनुमान वार्डातील गरिबांच्या घरकुलाचा बळी?

 ✍️ देसाईगंज : भाजपने ज्यांच्या जीवावर नगर परिषद जिंकली, त्याच हनुमान वार्डाच्या नगराध्यक्षांना तिकीट नाकारून भाजपने आधी विश्वासघात केला. जनतेने रागात काँग्रेसला निवडून दिले, आता त्याचा सूड गरीबांच्या घरकुलातून घेतला जातोय का? असा आग लावणारा सवाल आज वडसात विचारला जात आहे.


405 घरकुले मंजूर झाली, पण फक्त हनुमान वार्डातील लोकांच्या फाईलींना कुलूप! हे योगायोग असूच शकत नाही, असा आरोप वार्डकऱ्यांचा आहे.


भाजपच्या गडालाच भाजपची शिक्षा?

कधी भाजपचा झेंडा अभिमानाने मिरवणारा वार्ड, आज त्याच पक्षाच्या काळात परवानगीसाठी तडफडतोय. नगराध्यक्षपद देऊनही ज्या वार्डाचा सन्मान राखता आला नाही, त्या नेतृत्वाला जनता माफ करेल का?



स्थानिकांचा थेट आरोप आहे - "आम्ही भाजपला सोडले म्हणून आमच्या हक्काच्या घरावर टाच आणली जात आहे. ही लोकशाही की हुकूमशाही?"


प्रशासन तोंडाला कुलूप लावून बसले आहे, पण जनता गप्प बसणार नाही. घरकुल रोखणाऱ्यांना जनता घरचा रस्ता दाखवेल, अशी संतप्त प्रतिक्रिया हनुमान वार्डातून उमटत आहे.

Post a Comment

0 Comments